औरंगाबाद - योगी सरकारच्या काळात लोकांवर अत्याचार केला जात आहे. त्यामुळेच योगी सरकार बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली. उत्तर प्रदेशातील हाथरस येथील घटनेचा निषेध करताना ते बोलत होते.
योगी सरकार बरखास्त करा, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी - औरंगाबाद आंदोलन बातमी
योगी सरकारच्या काळात लोकांवर अत्याचार होत आहे. यामुळे योगी सरकार बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
चंद्रकांत खैरे
योगी सरकारला राजीनामा मागणाऱ्यांनी स्वतः राजीनामे दिले पाहिजे, अशी टीका विधान परिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. राज्यात महिला सुरक्षित नाहीत, असा आरोपही केला होता. त्यावर खैरे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिल. ते काही विनाकारण आरोप करत आहेत. काही अभ्यासपूर्ण आरोप केले पाहिजेत अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी केली.
हेही वाचा -औरंगाबाद : राहुल गांधी यांच्याशी झालेल्या धकाबुक्कीचा काँग्रेसने केला निषेध
Last Updated : Oct 3, 2020, 9:14 PM IST