वैजापूर (औरंगाबाद)- औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते आर.एम. वाणी यांचे अल्पशा आजराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मागील १५ दिवसांपासून माजी आमदार वाणी यांच्यावर औरंगाबाद येथील धूत रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
माजी आमदार आर.एम. वाणी यांचे निधन, वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - आर एम वाणी यांचे निधन
औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते आर.एम. वाणी यांचे अल्पशा आजराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. मागील १५ दिवसांपासून माजी आमदार वाणी यांच्यावर औरंगाबाद येथील धूत रुग्णालयात उपचार सुरु होते
वैजापूरचे माजी आमदार आर एम वाणी
अशी होती राजकीय कारकीर्द
माजी आमदार वाणी हे वैजापूरचे नगराध्यक्ष राहिले होते. त्यानंतर सलग १५ वर्षे ते विधानसभेवर निवडून गेले. वैजापूर मतदारसंघातील शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी आमदार वाणी यांनी नांदूर मधमेश्वर कालव्याचे काम पूर्ण करुन घेतले होते. माजी आमदार वाणी यांच्या जाण्याने स्थानिकांमध्ये तालुक्याचे नेतृत्व हरपल्याची भावना आहे. विनायकराव पाटील यांच्यानंतर वाणी यांनी तालुक्याचे नेतृत्व केले होते.