औरंगाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद भरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय कोणत्याही प्रकारच्या सैन्यात समन्वय ठेवण्यास मदत करणारा असल्याचे मत माजी लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफने समन्वयाचा अभाव कमी होईल - डॉ. सतीश ढगे
भारतीय सैन्याच्या तिन्ही दलात समन्वय राखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद मदत करणार. तसेच यामुळे आपल्या देशाची सुरक्षा चांगली होणार असल्याचे मत माजी लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.
आपल्या सैन्याच्या तिन्ही दलात समन्वय नाही हे अनेकदा समोर आले. त्यामुळे कारगिल युद्धात आपल्याला त्याची किंमत मोजावी लागली होती. मात्र, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद भरल्यावर योग्य समन्वय होईल. त्यामुळे आपल्या देशाची सुरक्षा चांगली होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
काही प्रमुख देशांमध्ये आधीच हे पद अस्तित्वात आहे. त्या देशांच्या पंगतीत आता भारत असेल. या पदामुळे सर्व सैन्यदल थेट पंतप्रधानांच्या संपर्कात असेल. त्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता अधिक असेल. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली भूमिका योग्य आणि देशाच्या फायद्याचे असल्याचे यावेळी डॉ. सतीश ढगे म्हणाले.