औरंगाबाद - 'यापुढे मला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई किंवा संजना जाधव यांचा पती म्हणू नका, मी संजनापासून वेगळं होण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. इतकंच नाही तर, त्यांच्याविरोधातील पुरावे न्यायालयात सादर करून यांनी मला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचेही मी न्यायालयात सांगितले आहे', असे कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एका व्हिडिओद्वारे सांगितले आहे.
'आपला संसार चांगला चालावा म्हणून आपण राजकारणाचा त्याग करून आपला वारस म्हणून पत्नी संजनाला पुढे केलं. मात्र, मला होणारा त्रास कमी न झाल्याने संजनाला वारस ठरवण्याचा निर्णय मागे घेत असून पुढील निर्णय लवकरच जाहीर करू,' असे हर्षवर्धन जाधव यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओत म्हणलं आहे.
'मला रावसाहेब दानवेंचा जावई म्हणू नका, मी घटस्फोट घेतोय' - Sanjana Jadhav News
'आपला संसार चांगला चालावा म्हणून आपण राजकारणाचा त्याग करून आपला वारस म्हणून पत्नी संजनाला पुढे केलं. मात्र मला होणार त्रास कमी न झाल्याने संजनाला वारस ठरवण्याचा निर्णय मागे घेत असून पुढील निर्णय लवकरच जाहीर करू,' असे हर्षवर्धन जाधव यांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओत म्हणलं आहे.
'रावसाहेब दानवे आणि संजना जाधव यांच्याविरोधात माझ्याकडे असलेले सर्व पुरावे मी न्यायालयात सादर केले आहेत, असेही हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. मी वैयक्तिक आयुष्यामध्ये स्वतः लढणार आहे. माझ्या निर्णयानंतर दानवे मोठ्या प्रमाणात राग धरून माझ्या अंगावर येतील. त्यांना काय करायचं ते त्यांनी करावं. मात्र, आता हा निर्णय बदलणार नाही. संसार चालावा म्हणून मी राजकारणाचा खरंतर त्याग केला होता. मात्र, होणारा त्रास थांबला नाही. त्यामुळे आता हा निर्णय घ्यावा लागतोय. रावसाहेब दानवे यांनी माझ्या घरांमध्ये दोन महिला पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. या कर्मचाऱ्यांनी मी काही प्रतिकार केला तर माझ्यावर थेट गुन्हे दाखल करतील अशी धमकीच मला दिलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेब मला वाचवा माझे रक्षण करा,' असं विनंती करणारा व्हिडिओ हर्षवर्धन जाधव यांनी समाज माध्यमांवर प्रसारित केलाय.
'मला रावसाहेब दानवे यांनी खूप घाणेरड्या स्वरूपाची वागणूक दिली. मी दिल्लीला जाऊन त्यांची भेट घेतली, मोठ्यांनी भांडण सोडवायला हवेत, मात्र मी लहान असूनही आमचं भांडण सोडवा अशी विनंती त्यांनी केली होती. मात्र, तसं झालं नाही. ते मंत्रिपदाचा गैरवापर करतात. यापुढे मला कोणीही त्यांचा जावई म्हणून संबोधू नका किंवा संजनाचा पती म्हणूनही संबोधून नका. माझ्या कन्नड सोयगाव मतदार संघात संजना जाधव या माझ्या राजकीय वारस असतील, अशी घोषणा केली होती. कारण राजकारण दिल्यावर किमान माझा संसार सुरळीत चालेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे आपण संजनाला वारस ठेवण्याचा निर्णय आता मागे घेत आहोत. यापुढे आपले काय रणनीती असेल याबाबत लवकरच निर्णय घेऊ,' असेही हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या प्रसारित केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.