औरंगाबाद - राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिलेले सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर शेतकरी नेत्यांनी मात्र रोष व्यक्त केला आहे. मराठवाड्यात मान्यताप्राप्त सावकाराकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी केला आहे.
जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेते शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची भूमिका सरकारची असणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. नुकतेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबतनिर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्त करण्यासाठी सरकारने 65 कोटींचा तरतूद करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर साडेसहा कोटी रुपये तातडीने देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हेही वाचा -'त्या' घटनेने लागला लळा.. आता करतो 100 भटक्या कुत्र्यांचा सांभाळ
सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या निर्णयात विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास सरकारकडून देण्यात येत असला तरी शेतकरी संघटनांनी या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही असे मत व्यक्त केले आहे. मराठवाड्यात खाजगी मान्यताप्राप्त सावकारांची संख्या जास्त नाही. अनेक शेतकरी मिळेल त्या सावकाराकडून कर्ज घेतात. त्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची खरी गरज आहे. मायक्रो फायनान्सच्या कर्जामुळे जालन्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केली. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ करण्याचा निर्णय जास्त फायद्याचा राहणार नाही, असे मत अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -औरंगाबादमधील मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणावर आयुक्तांचा हातोडा