महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गंगापूर तालुक्यात वनीकरण मोहिमेचा उडाला बोजवारा - गंगापूर सामाजिक वनीकरण विभाग

गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना वृक्षरोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांचे वाटप करण्यात आले. मात्र, ग्रामपंचायतींकडून या योजनांना पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे.

वाळलेल्या रोपांचा ढिगारा

By

Published : Oct 17, 2019, 10:15 AM IST

औरंगाबाद - नैसर्गिक आपत्ती, पर्यावरणाचे बदलते स्वरूप लक्षात घेता राज्यभरात सरकारच्या विविध विभागांमार्फत आणि सामाजिक संस्थांकडून वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले जातात. दरवर्षी झाडे लावण्यासाठी सरकार लाखो रुपये खर्च करून योजना राबवत आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडून या योजनांना पायदळी तुडवले जात आहे.

हेही वाचा- रविकांत तुपकरांचा १९ दिवसानंतर 'स्वाभिमान' जागा.. बूंद से गयी वो हौदसे आयेगी?


गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींना वृक्षरोपणासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून रोपांचे वाटप करण्यात आले. मात्र, कदीम शहापूर ग्रामपंचायतने या रोपांची लागवड केली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूलाच या वाळलेल्या रोपांचा ढिगारा पडला आहे. याबाबत सरपंचांशी संवाद साधला असता, सर्व रोपांचे वाटप करण्यात आले आहे असे सांगितले. मग हा वाळलेल्या रोपांचा ढिग कसा दिसतो? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details