औरंगाबाद - पडेगावमधील राबिया लिन बनात या उर्दु मदरश्यातील मदरश्यातील ७० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. जेवणानंतर सर्व मुलींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व मुली धोक्याबाहेर असल्याची माहिती महापौरांनी दिली.
औरंगाबादमध्ये मदरश्यातील ७० विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा - hospita
औरंगाबादमधील पडेगाव येथे राबिया लिन बनात मदरश्यातील तब्बल ७२ मुलींना जेवणातून विषबाधा.
पडेगावातील राबिया लिन बनात या उर्दु मदरश्यातील विद्यार्थिनींना शहरातील शिल्लेखाना भागात एका कार्यक्रमात दावतसाठी नेण्यात आले होते. या दावतमध्ये शिक्षक ७० च्या जवळपास विद्यार्थिंनीना घेऊन गेले होते. येथे जेवण केल्यानंतर सर्व विद्यर्थिनींना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडले यांनी रुग्णांची भेट घेतली. सर्व रुग्ण धोक्याबाहेर असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, ७२ विद्यार्थीनी उपचार घेत असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांना देखील या ठिकाणी दमदाटी करण्यात येत आहे. मोठा जमाव रूग्णालयात दाखल झाला आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आहे.