औरंगाबाद - शहरातील गारखेडा परिसरात राहणाऱ्या पाच वर्षीय गीतने एका मिनिटात दोन्ही हाताने सलग २२० वेळा ट्रिबलिंग टप्पे पाडत बास्केटबॉल खेळला आहे. याची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नुकतीच नोंद करण्यात आली आहे. अवघ्या पाच वर्षात गीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
शहरातील गारखेडा परिसरात राहणाऱ्या गीत विजय सूर्यवंशी असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केलेल्या चिमुकलीचे नाव आहे. गीत अवघ्या पाच वर्षांची असून वडील खासगी बँकेत नोकरीला असून आई जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहे. गीत लहानपणापासून हुशार तिला खेळ खेळण्याची आवड होती. यामुळे गीत आई वडिलांनी तिला सर्व खेळांची माहिती दिली. यामध्ये गीत बास्केटबॉल या खेळाकडे जास्त लक्ष देत असल्यामुळे त्यांनी बास्केटबॉलची माहिती दिली. सरावानंतर एका मिनिटात दोन्ही हाताने सलग २२० वेळा ट्रिबलिंग टप्पे पाडत बास्केटबॉल खेळला याची 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद करण्यात आली. अवघ्या पाच वर्षात गीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. गीतच्या आई वडिलांनी तिचा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी ८ एप्रिल रोजी अर्ज केला. या अर्जाची दाखल घेतली. दरम्यान २६ एप्रिल रोजी गीतला रेकॉर्ड नोंदवल्याचा निरोप आला. त्यानंतर इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे मेडल, प्रमाणपत्र नुकतेच पोस्टाने मिळाले.
महिनाभरात आईने केली तयारी