महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोळंबी येथे जुगार खेळताना 5 जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले; लाखोंचा मुद्देमाल जप्त - Jagdish satav

पिशोर हद्दीतील कोळंबी शिवारात सुदाम विष्णु शिंदे, योगेश भालू राठोड़, उमेश गोकुळ मोकासे, अशोक गोणाजी मोकासे, नारायण दोमोधर जाधव हे सर्वजण तिरट नावाचा जुगार खेळ खेळत असताना कन्नड पोलीस उपविभागीय पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

five people caught by police for playing wager
कोळंबी येथे जुगार खेळताना 5 जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले; लाखोंचा मुद्देमाल जप्त

By

Published : Apr 30, 2020, 3:05 PM IST

कन्नड(औरंगाबाद)-कन्नड तालुक्यातील कोळंबी शिवारात 5व्यक्तींना पोलिसांनी जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी त्याचाकड़ून 1लाख 18 हजार 200 रुपयांचा मद्देमाल जप्त केला आहे

पिशोर हद्दीतील कोळंबी शिवारात सुदाम विष्णु शिंदे, योगेश भालू राठोड़, उमेश गोकुळ मोकासे, अशोक गोणाजी मोकासे, नारायण दोमोधर जाधव हे सर्वजण तिरट नावाचा जुगार खेळ खेळत असताना कन्नड पोलीस उपविभागीय पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे.

जुगार खेळल्या प्रकरणी संबंधिताकडून रोख रक्कम रुपये 21700, मोबाईल, मोटार सायकल सह एकूण 1,18,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीच्या विरूद्ध 188, 269, भादविसह 12 (अ) मजुकासह, कोविड़ 19 उपाययोजना अधिनियम 2020, नियम क 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी जगदीश सातव यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप भिवसने, पोलीस नाईक जिवन लोदवाल, राहुल लहाने, केसरसिंग राजपूत, पोलीस शिपाई महेश जाधव यांनीही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details