महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद-जालना महामार्गावर भीषण अपघात; पाच जण जागीच ठार, तीन गंभीर जखमी - बोलेरो टेम्पो एसटी बस धडक

औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव शिवारातील हॉटेल स्वराज मराठा हॉटेलसमोर बोलेरो पिकअप टेम्पो याची एसटी बसला जोरात धडक. या भीषण अपघातामध्ये टेम्पोतील पाच कामगार जागीच ठार झाले, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले.

Bolero Pickup Tempo
बोलेरो पीकअप टेम्पो

By

Published : May 26, 2022, 10:28 AM IST

Updated : May 26, 2022, 11:10 AM IST

औरंगाबाद : औरंगाबाद-जालना महामार्गावर ( Horrible accident on the highway ) भरधाव बोलेरो पिकअप टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने जाणाऱ्या एसटी बसवर धडकल्याने ( Bolero pickup tempo hits ST bus ) पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. ( Five killed, three injured in road mishap ) औरंगाबाद-जालना मार्गावर गाढेजळगाव शिवारातील हॉटेल स्वराज मराठा हॉटेलसमोर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, बसवर आदळल्यावर बोलेरो पिकअप टेम्पो अक्षरशः पूर्णतः कापला गेला.

असा घडला अपघात : सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य परिवहन मंडळाची महामंडळाची पुणे-कळमनुरी बस (क्र. एमएच १३ सीयू ६८३८) ही औरंगाबादहून जालनाकडे जात होती. तर त्याच वेळी बोलेरो पिकअप टेम्पो (क्र. एम.एच.२१ बीएच ४३३१) जालन्याहून औरंगाबादकडे येत होता. गाढेजळगाव शिवारातील हॉटेल स्वराज मराठासमोर दोन्ही वाहने येताच बोलेरो पिकअप टेम्पो चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि टेम्पो दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसवर जाऊन आदळला. यावेळी भरधाव वेगात असलेल्या बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून तातडीने वेग कमी करीत बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेतली. तरीही भरधाव वेगात असलेला टेम्पो बसला जाऊन धडकला. यावेळी झालेल्या भीषण अपघातात टेम्पोचा चुराडा झाला. बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच बोलेरो गाडी बसवर आदळल्याने अपघातानंतर मोठा आवाज झाला. ही धडक एवढी जोराची होती की, पिकअप टेम्पो अक्षरशः पूर्णपणे कापली गेला. यावेळी टॅम्पोत जवळपास आठ जण होते. ते सर्व कामगार असून, ते आपल्या कामावरून औरंगाबाद येथे परतत होते.

स्थानिकांनी केली मदत, पोलिस घटनास्थळी रवाना : अपघाताच्या आवाजाने महामार्गावरील दोन्ही बाजूंच्या वाहन चालकांसह बाजूच्या हाॅटेलमधील कर्मचारी व ग्राहकांनी घटनास्थळी धावले. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, उपनिरीक्षक दादासाहेब बनसोडे, प्रेम म्हस्के, चालक शत्रुघ्न मडावी, नारायण भिसे, सुनील गोरे, संतोष पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातातील जखमींना वाहनाबाहेर काढले. यानंतर रुग्णवाहिकेद्वारे औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया, उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर यांनी भेट देऊन सूचना दिल्या.


घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे :या भीषण अपघातात ठार झालेले पाचही जण औरंगाबाद येथील आहेत. अशोक चव्हाण (४५), पारुबाई जाधव (४०), शांतीलाल चव्हाण (५०), रणजित चव्हाण (३८,सर्व रा. सातारा तांडा, औरंगाबाद) आणि लहू ज्योतिराम राठोड (५५, रा. रेणुका नगर, बीड बायपास, औरंगाबाद) अशी या पाच जणांची नावे आहेत. जखमींची नावे मात्र अद्याप समजू शकलेली नाहीत.

हेही वाचा : Six Died in Accident : सोलापूर - पंढरपूर मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू; तिघे जखमी

Last Updated : May 26, 2022, 11:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details