महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद : तिहेरी तलाकचा शहरातील पहिला तर, राज्यातील दुसरा गुन्हा दाखल - jinsi police station

तीन तलाक विरोधी कायद्यांतर्गत शहरात पहिला गुन्हा जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी छळ झाल्यानंतर माहेरी आलेल्या विवाहितेला तीन तलाक दिल्याची घटना शहरात घडली आहे. सदर घटनेची चौकशी करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हा राज्यात दाखल झालेला दुसरा गुन्हा असून यापूर्वी ठाणे शहरात एक गुन्हा दाखल झाला होता.

औरंगाबाद : तीन तलाकचा शहरातील पहिला तर राज्यातील दुसरा गुन्हा दाखल

By

Published : Aug 14, 2019, 6:37 PM IST

औरंगाबाद - तीन तलाक विरोधी कायद्यांतर्गत शहराती पहीला गुन्हा जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी छळ झाल्यानंतर माहेरी आलेल्या विवाहितेला तीन तलाक दिल्याची घटना शहरात घडली आहे. सदर घटनेची चौकशी करून मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. हा राज्यात दाखल झालेला दुसरा गुन्हा असून यापूर्वी ठाणे शहरात एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली आहे.

तीन तलाकचा शहरातील पहिला तर राज्यातील दुसरा गुन्हा दाखल

याबाबत केंद्रे यांनी सांगितले की, नारेगाव भागात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचा २०१८ मध्ये शेख सलमान शेख लाल याच्यासोबत मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता. काही दिवस चांगले वागविल्यानंतर दोन लाख रुपये हुंडा आणण्यासाठी तिचा छळ केला जाऊ लागला. त्यामुळे विवाहितेच्या वडिलांनी सासराच्या मंडळीविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात छळाचा गुन्हा दाखल केला होता. घटनेला वेगळे वळण देण्यासाठी विवाहितेचा सासरा शेख लाल शेख युसूफ याने जिन्सी पोलीस ठाण्यात सून हरवल्याची खोटी तक्रार दिली होती. मात्र, पोलीस चौकशीत ही बाब खोटी निघाल्याने त्यांनी जिन्सी पोलिसांसमोर चूक मान्य करून माफी मागितली होती.

विवाहिता सासरी परत जाताच सऱ्याकडून तिची छेडछाड, पतीकडून मारहाण असा प्रकार पुन्हा सुरू झाल्याने विवाहितेने एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात छळाची तक्रार दाखल केली. त्यानंतर झालेल्या वादादरम्यान पतीने तरूणीला तीन तलाक दिला. या प्रकरणी मंगळवारी (दि.१३) रोजी मुस्लीम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा २०१९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details