औरंगाबाद :जिल्ह्यातील पडेगाव येथे एका हॉटेलवर दोन अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मंगळवारी रात्री हा गोळीबार केला. मनीष इन असे या हॉटेलचे नाव आहे. धमकावण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
डेगाव मिटमिटा रोडवर पोलीस कॉलनीसमोर गायकवाड यांची मनीष इन हॉटेल लॉजिंग आणि बोर्डिंग आहे. या हॉटेलवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळीबार केला. यातील एकाने हॉटेलच्या काउंटर समोर असलेल्या सोप्यावर हॉटेल चालकाचा मुलगा झोपलेला असेल या अंदाजाने हा गोळीबार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, या सोप्यावर हॉटेल कर्मचारी झोपलेला होता पहाटेच्या सुमारास झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अज्ञाताने एक गोळी सोपेच्या दिशेने मारली तर दुसरी कॅश काउंटरच्या वर असलेल्या रूममध्ये झाडली. गोळीबार करण्यासाठी आलेल्या दुचाकी धारकांनी तोंडावर मास आणि हेल्मेट घातले असल्यामुळे त्यांचा चेहरा अस्पष्ट दिसत नव्हता. दोन्ही दुचाकीस्वार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलीस आयुक्त आयुक्त निखिल गुप्ता सहाय्यक पोलीस आयुक्त खाटमोडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.