महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद; रस्ता अडवल्याचा जाब विचारला म्हणून गोळीबार; एक गंभीर जखमी - औरंगाबाद क्राईम न्यूज

बुढीलेन कडून नेहरू भवनकडे जाणाऱ्या गल्लीत भंगाराचे एक मोठे गोदाम आहे. या गोदामाच्या पाठीमागे चिमण्या राजाच्या हवेलीजवळ काही नागरिक राहतात. या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास भंगाराचे साहित्य टाकले होते. मोठी वाहने उभी होती. त्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील रहिवासी अब्दुल रजाक याने रस्ता का आडवला, असा प्रश्न भंगारमालक राजा यांना केला. यामुळे वाद निर्माण झाला.

रस्ता अडवल्याचा जाब विचारला म्हणून गोळीबार
रस्ता अडवल्याचा जाब विचारला म्हणून गोळीबार

By

Published : Jan 29, 2021, 9:07 AM IST

औरंगाबाद-बुढीलेन परिसरात रस्ता अडवल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तरुणाने गावठी कट्टयाने गोळीबार केल्याची घटना घडली. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून उपचारासाठी त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाला आहे.

जाब विचारला म्हणून गोळीबार
बुढीलेन कडून नेहरू भवनकडे जाणाऱ्या गल्लीत भंगाराचे एक मोठे गोदाम आहे. या गोदामाच्या पाठीमागे चिमण्या राजाच्या हवेलीजवळ काही नागरिक राहतात. या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास भंगाराचे साहित्य टाकले होते. मोठी वाहने उभी होती. त्यामुळे येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे येथील रहिवासी अब्दुल रजाक याने रस्ता का आडवला, असा प्रश्न भंगारमालक राजा यांना केला. यामुळे वाद निर्माण झाला.

पुन्हा येऊन झाडल्या गोळ्या...
यावेळी राजासेठ यांचा वाहन चालक अक्रम तिथे आला. रस्त्यावरून सुरू असलेला वाद बघून आक्रमने गावठी कट्टा काढून गोळीबार केला. त्याने सहा गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर राजा यांनी आक्रमला घटनास्थळावरुन जाण्यास सांगितले. मात्र, काही वेळेनंतर आक्रम पुन्हा तिथे आला आणि त्याने गावठी कट्याने दोनदा गोळ्या झाडल्या. या गोळीबारात अब्दुल सत्तार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल....
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त निखिल गुप्ता तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.मात्र, आरोपी आक्रम घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details