औरंगाबाद - जालना येथून मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने पेट घेतला. ही घटना नागपूर-मुंबई महामार्गावर शनिवारी घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
इंजिनमध्ये बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने घेतला पेट - महामार्ग
मुंबईकडे लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने धावत्या ट्रकने पेट घेतला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.
करंजगाव परिसरात ट्रक चालक प्रदीप चव्हाण हा (एम. एच. ०४ ई. एल. २८९४) या ट्रकने लोखंडी सळ्या घेऊन मुंबईकडे जात होता. दरम्यान, परसोडा फाट्याजवळ येताच ट्रकच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाले. यात मशीनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करून गाडीतून उडी मारली.
ग्रामस्थांनी रस्त्याने जाणारे पाण्याचे टँकर थांबवले आणि ट्रकवर पाणी मारून ही आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. यावेळी परिसरातील पाणी टँकर चालक सोन्याबापू मराठे, रवी मोकळे सतीश मगर, तुकाराम वाळके आणि ग्रामस्थांनी मदत केल्याने पुढील अनर्थ टळला.