महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळूजमध्ये रसायननिर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग - वाळूज

वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लांट ८५ मध्ये असलेल्या 'सिस्ट झी' या विविध रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज सायंकाळी अचानकपणे भीषण आग लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱया आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले.

रसायननिर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग

By

Published : May 6, 2019, 8:23 PM IST

औरंगाबाद- केमीकलचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत आज (सोमवार) सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. वाळूज औद्योगिक परिसरातील प्लांट क्रमांक ८५ मध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

वाळूजमध्ये रसायननिर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग

वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्लांट ८५ मध्ये असलेल्या 'सिस्ट झी' या विविध रसायन उत्पादन करणाऱ्या कंपनीला आज सायंकाळी अचानकपणे भीषण आग लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱया आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. कंपनीतील कर्मचाऱ्यानी अग्निशमन दलाला माहिती देताच अग्निशमन दलाचे २ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने एमआयडीसी, बजाज ऑटो व मनपाच्या बंबाच्या साहाय्याने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आगीत गॅस सिलेंडरचे स्फोट होत असल्याने आग विझवण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत. कंपनीतील मस्तराम नावाचा कर्मचारी आगीत किरकोळ भाजला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीने शेजारील टाइको निप्पोन या कंपनीला देखील वेढले आहे. यासाठी अधिक अग्निशमन दलाचे बंब मागवण्यात येत आहेत. या आगीमुळे कामगारांमध्ये प्रचंड भीती पसरल्याने परिसरात धावपळीचे वातावरण निर्माण झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details