औरंगाबाद- शेंद्रा एमआयडीसीमधील प्रसिद्ध स्कोडा कंपनीसमोरील लाकडाच्या गोदामाला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली.
शेंद्रा एमआयडीसीत लाकडाच्या गोदामाला भीषण आग - अग्निशमन दल
शेंद्रा एमआयडीसी येथे स्थित असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे ७ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.
लाकडाच्या गोदामाला भीषण आग
शेंद्रा एमआयडीसी येथे स्थित असलेल्या एका लाकडाच्या गोदामाला आज दुपारी अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाचे ७ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लाखो रुपयांचे नुकसान या आगीत झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.