औरंगाबाद- सकाळी अचानक सिटीचौक भागातील चप्पलच्या दुकानाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्याने शेजारीच सुवर्ण अलंकारांसाठी प्रसिद्ध असलेला झवेरी बाजार थोडक्यात बचावला आणि पुढील अनर्थ टळला.
सिटीचौकात दुकानाला आग; झवेरी बाजार थोडक्यात बचावला - City
सिटीचौक भागात असलेल्या प्रिन्स नावाच्या एका चप्पल विक्रीच्या दुकानाला आज सकाळी अचानक आग लागली. नागरिकांनी आगीची माहिती देताच पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. दोन बंबाच्या साह्याने एक तासाच्या अथक परिश्रमा नंतर आग आटोक्यात आली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
सिटीचौकात दुकानाला आग; झवेरी बाजार थोडक्यात बचावला
सिटीचौक भागात असलेल्या प्रिन्स नावाच्या एका चप्पल विक्रीच्या दुकानाला आज सकाळी अचानक आग लागली. नागरिकांनी आगीची माहिती देताच पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. दोन बंबाच्या साह्याने एक तासाच्या अथक परिश्रमा नंतर आग आटोक्यात आली. या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. वेळीच आग विझवल्याने बाजूलाच असलेली अनेक सोने विक्रीची दुकाने थोडक्यात बचावली व मोठा अनर्थ टळला.
Last Updated : Jun 12, 2019, 3:05 PM IST