औरंगाबाद- अमेरिकेतून परतलेल्या दाम्पत्याला कोरोना आजाराची लागण झाल्याची अफवा पसरवणाऱ्या पैठण शहरातील एका खासगी डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दाम्पत्य आपल्या अमेरिकेतील मुलाला भेटून भारतात परतले होते. याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे डॉक्टराविरोधात पहिलाच गुन्हा दाखल झाला असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा -COVID-19: शनिवारपासून मद्य दुकाने बंद... तळीरामांची 'स्टाॅक'साठी गर्दी
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पैठण येथील भवानीनगरमध्ये राहणारे दत्तात्रेय जगन्नाथ चन्ने (वय 65) हे आपल्या पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक असलेल्या मुलाला भेटून नुकतेच पैठण शहरात परतले आहेत. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता व खबरदारी म्हणून राज्य शासनाने आरोग्य विभागामार्फत विदेश दौऱ्यावरून आलेल्या प्रत्येक नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पैठण येथील सरकारी रुग्णालायातील वैद्यकीय पथकाने संबधित दांपत्याच्या घरी जाऊन तपासणी केली. मात्र, त्यांना कोरोना आजार किंवा लागण झाली नसल्याचे निदान झाले असून तसे प्रमाणपत्रही डॉक्टरानी दिले आहे.
तर शहरातील गजानन रूग्णालयातील खासगी डॉक्टर अनिल सासणे यांनी या दाम्पत्याला कोरोना आजार असल्याचे त्यांचे जवळचे नातेवाईक अशोक गायकवाड यांना फोन करून सांगितले. त्यामुळे अशा प्रकारे अफवा पसरल्यामुळे संबधित दाम्पत्याची समाजामध्ये बदनामी झाली आहे. संबधीत व्यक्तीचे नातेवाईक त्यांच्याकडे कोरोनाचे रुग्ण असल्याच्या संशयी नजरेने पाहू लागले आहेत. या अफवेमुळे समाजात चन्ने दाम्पत्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आहे. त्यामुळे खेर पैठण पोलिस ठाणे गाठून या दाम्पत्याविरोध तक्रार दाखल केली. दत्तात्रय चन्ने यांच्या तक्रारीवरुन डॉक्टर अनिल सासणे यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास जमादार गोपाळ पाटील हे करत आहेत.
हेही वाचा -नऊ महिन्याच्या चिमुरडीसह विवाहितेची आत्महत्या; कारण अस्पष्ट