महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबादेत जनता कर्फ्यूच्या चार दिवसात 730 वाहनांवर कारवाई - औरंगाबाद संचारबंदी उल्लंघनप्रकरणी कारवाई

औरंगाबाद शहरात 10 ते 18 जुलैपर्यंत लावण्यात आलेला जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत असून गुन्हे दाखल करण्यासह दुचाकी जप्त करण्यात येत असून जवळपास 730 वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

जनता कर्फ्युच्या चार दिवसात 730 वाहनांवर कारवाई
जनता कर्फ्युच्या चार दिवसात 730 वाहनांवर कारवाई

By

Published : Jul 14, 2020, 8:26 PM IST

औरंगाबाद : शहरात कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. मात्र, या काळात अनेकजण विनाकारण रस्त्यावर वावरताना दिसून आले. या सर्व लोकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 1 हजार 879 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

औरंगाबाद शहरात जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात येत असून गुन्हे दाखल करण्यासह दुचाकी जप्त करण्यात येत असून जवळपास 730 वाहनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता 10 ते 18 जुलैपर्यंत जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लॉकडाऊन करण्यात आले आहे. मार्च महिन्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक नागरिक वेगवेगळ्या कारणाने घराबाहेर पडल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे 9 दिवसांच्या या बंदमध्ये अत्यावश्यक सेवेत असलेली किराणा दुकान, पेट्रोल पंप, भाजीपाला हे सर्व विक्रीस बंदी घालण्यात आली. काही निवडक दुकाने सोडली तर शहरातील सर्वच औषधी दुकान बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिकांना बाहेर पडण्यासाठी कोणतेच कारण देण्यात आले नाही. असे असले तरी अनेकजण विनाकारण रस्त्यावर विनाकारण वावरताना दिसून आले. अशा लोकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून मागील चार दिवसांमध्ये 730 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 1 हजार 879 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी दिली. ज्यामध्ये 10 जुलै रोजी 152, 11 जुलैरोजी 156, 12 जुलैरोजी 190, 13 जुलैरोजी 232 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. तर, शहरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर नाकाबंदी लावण्यात आली असून शहरात येणाऱ्या लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच, विनापरवाना येण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर पोलीस कारवाई करत आहेत. कोरोनाला हरवण्यासाठी जिल्ह्यात कडक पावलं उचलण्यात येत असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती औरंगाबाद शहर पोलिसांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details