औरंगाबाद: कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सर्वच धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली होती. तब्बल 23 महिण्यांपासून निर्बंध कायम राहिले. मात्र कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने धार्मिक स्थळ काही प्रमाणात उघडण्यात आली. पण गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश नव्हता. त्यामुळे भक्तांना देवाच दर्शन दुरूनच घ्यावे लागत होते. आता रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने सोमवार एक मार्चपासून कोरोनाचे नियम शिथिल होण्याची शक्यता आहे. त्याचाच एक भाग म्हणून घृष्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात भक्तांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.
Ghrishneshwar Temple Entery : सोमवार पासून घृष्णेश्वर मंदिर गाभाऱ्यात प्रवेश, लसीकरण बंधनकारक - लसीकरण बंधनकारक
लसीचे दोन डोस घेतलेल्या (Famous among the twelve Jyotirlingas) असलेल्या घृष्णेश्वर मंदिराच्या ( Ghrishneshwar Temple) गाभाऱ्यात सोमवार एक मार्चपासून भाविकांना प्रवेश मिळणार आहे. कोरोनाच्या अनुषंगाने गेल्या 23 महिन्यांपासून मंदिराचा गाभरा भक्तांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र निर्बंध कमी होत असल्याने लसीचे दोन डोस घेतलेल्या भक्तांना ( who have taken two doses of vaccine) मंदिर प्रवेश देण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी दिली आहे.
घृष्णेश्वर मंदिर
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घुश्मेश्वर मंदिराचा गाभारा खुला करण्याबाबत विश्वासाची संवाद साधून निर्णय घेतला आहे. एक मार्च पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, त्यासाठी भाविकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेणे त्याचबरोबर मास्क घालने देखील बंधनकारक राहणार आहे. डोस घेतल्याचे प्रमाणपत्र पाहूनच प्रवेश दिला जावा असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.