औरंगाबाद- जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. रविवारी सकाळी जिल्ह्यात आणखी दोन नवे रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्ण संख्या 51 वर पोहोचली आहे. शहरात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या परिसरात नव्याने दोन रुग्ण आढळून आले आहेत.
औरंगाबादेत कोरोनाचे अर्धशतक, बाधितांची संख्या 51 वर - औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा
असेफिया कॉलनीतील 35 वर्षीय महिलेला तर समतानगर येथील 65 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 36 तासात औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. 36 तासात 11 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, दोन दिवसांपूर्वी असलेली 40 रुग्ण संख्या आता 51 वर जाऊन पोहोचली आहे.

रुग्ण संख्येने झपाट्याने अर्धशतक पूर्ण केले आहे. सध्या स्थितीत औरंगाबाद जिल्ह्यात 51 पैकी 22 रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 5 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 24 रुग्णांवर औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयात आणि घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुंदर कुलकर्णी यांनी दिली.