महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिकलठाणा रेल्वे स्थानकात पंधरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार - चिकलठाणा रेल्वे स्थानक क्राईम

वाराणसी येथून औरंगाबादमध्ये आलेल्या एका पंधरा वर्षीय मुलीवर शुक्रवारी तिघांनी अत्याचार केला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

sexual abuse
लैंगिक अत्याचार

By

Published : Jan 10, 2021, 9:51 AM IST

औरंगाबाद -वाराणसी येथून चिकलठाणा येथे आलेल्या एका १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रेल्वे स्थानकावर घडली. अज्ञात तरुणांनी शुक्रवारी माझ्यावर अतिप्रसंग केला, अशी तक्रार मुलीने पोलिसात दिली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुलगी रडत असल्याने उघडकीस आला प्रकार -

शुक्रवारी ८ जानेवारी रोजी संध्याकाळी चिकलठाणा रेल्वे स्थानकाच्या बाहेर एक मुलगी रडत असल्याचे नागरिकांना दिसले. नागरिकांनी ही बाब स्टेशन मास्तरांना सांगितली. याची रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत तिची चौकशी केली. त्यांनी या मुलीला मुख्य रेल्वे स्थानकावरील पोलीस ठाण्यात आणाले. तेव्हा तिने तिच्यावर अतिप्रसंग झाल्याचे सांगितले.

प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाजूला झाला अत्याचार -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाराणसी येथून १५ वर्षीय मुलगी नातेवाईकांसोबत शहरात आली होती. तिला ६ जानेवारीला शहरात ते सोडून निघून गेले. मध्यरात्री बाराच्या सुमारास ती रेल्वे स्थानकावर पोहोचली. पहाटे ती लघुशंकेसाठी प्लॅटफॉर्म नंबर एकच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये गेली होती. यावेळी तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details