गंगापूर(औरंगाबाद)-औरंगाबाद-अहमदनगर महामार्गावर भेंडाळा फाटा येथे मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल आणि टँकरचा अपघात झाला. या अपघातामध्ये पंधरा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील पाच जणाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना गंगापूर जिल्हा उपरुग्णालय आणि औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रॅव्हल बस- टँकरचा भीषण अपघात; पंधरा प्रवासी जखमी - औरंगाबाद अहमदनगर महामार्ग अपघात
औरंगाबाद नगर महामार्गावर भेंडाळा फाटा येथे औरंगाबादकडून येणारा टँकर (जी. जे 06 एव्ही 4949) आणि नगरकडून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची (एन. एल.01 बी 1530) समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये ट्रॅव्हल चालकासह पंधरा प्रवासी गंभीर जखमी झाले. यातील पाच जण गंभीर जखमी आहेत.

ट्रॅव्हल बस-टेम्पोचा भीषण अपघात
अपघातातील जखमीची नावे
संजय राजेंद्र परदेशी (अहमदनगर), गणेश रमेश महाजन(यवतमाळ,) मारुती आढाव (यवतमाळ), डॉक्टर संतोष कृष्णा पाटील (औरंगाबाद), संतोष जालिंदर म्हेत्रे (अहमदनगर) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. या अपघात प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.