औरंगाबाद - चढ्या भावाने सॅनिटायझर विकणाऱ्या दुकानदारांवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. शहरातील सिल्लेखाना भागात 'मानवता फार्मा' या दुकानावर ही कारवाई करण्यात आली, असून जवळपास 19 हजारांचे सॅनिटायझर जप्त करण्यात आले.
औरंगाबादमध्ये चढ्या भावाने सॅनिटायझरची विक्री, विक्रेत्यांवर कारवाई
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ ठेवा,असे सांगितले जात आहे. त्यामुळे बाजारात सॅनिटायझरची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. औरंगाबादमध्ये मानवता फार्मावरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर कारवाई करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ ठेवा,असे सांगितले जात आहे. त्यामुळे बाजारात सॅनिटायझरची मागणी प्रचंड वाढली आहे. अनेक ठिकाणी सॅनिटायझरच्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकारही उघडकीस येत आहेत. औरंगाबादमध्ये मानवता फार्मावरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या तक्रारीनुसार पाहणी केली असता 50 रुपयांना मिळणारे सॅनिटायझर 140 रुपयांना, तर 250 रुपयांना मिळणारी 500 एमएलची बाटली 560 रुपयांना विकली जात असल्याचे समोर आले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत 19 हजार रुपये किंमत असलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या जप्त केल्या. अशाच पद्धतीने चढ्या दराने जीवनावश्यक वस्तू विक्री होत असले, तर तक्रार करा, असे आवाहन अन्न व औषध विभागाने केले आहे.