औरंगाबाद -कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट येथे वडिलांकडून नियमित होणारी मारहाण व इतर त्रासामुळे त्रस्त झालेल्या मुलाने बापाचा खून करुन त्यांना घरातच खड्डा खोदून पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. कन्नड ग्रामीण पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.
तालुक्यातील जामडी फारेस्ट येथील नामदेव पोमा चव्हाण हे आपल्या पत्नी व मुला बाळा सह राहत होते. डिसेंबर महिन्यात मृत चव्हाण यांचा मुलगा रितेश नामदेव चव्हाण याच्यासोबत भांडण झाले होते. हाच राग मनात धरुन वडिलांना डोक्यात काठी मारुन जखमी केले व जिव जात नसल्याने फाशी दिली. हे कोणाला कळू नये म्हणून आरोपी मुलाने वडिलांचा मृतदेह घरातच दोन फुटाचा खड्डा खोदून पुरला.