कन्नड (औरंगाबाद) - तालुक्यातील पिशोर येथे पोटच्या मुलीशी लगट करून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बापास पिशोर पोलिसांनी अटक केली. गुरुवारी रात्री ही घटना उघडकीस आली.
कन्नड : पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापास बेड्या - latest aurangabad news
गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराने बदनामी होईल, या भीतीने मुलीने कोणाला काही सांगितले नाही. बुधवारी सकाळी मुलीला चिठ्ठी देऊन खोलीमध्ये येण्यास सांगितले. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितली.

मागील चार महिन्यांपासून येथील एक नराधम बाप हा आपल्या अल्पवयीन मुलीशी नेहमी लगट करून तिचा विनयभंग करत होता. तसेच अनेक वेळा तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत होता. या प्रकाराबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही देत होता. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराने बदनामी होईल, या भीतीने मुलीने कोणाला काही सांगितले नाही. बुधवारी सकाळी मुलीला चिठ्ठी देऊन खोलीमध्ये येण्यास सांगितले. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांनी दिली.
मुलीने दिलेल्या तक्रारीवरून विविध कलमांखाली बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. उपनिरीक्षक विजय आहेर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.