औरंगाबाद - अवकाळी पावसामुळे राज्यभरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये मराठवाड्यातील 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संबंधित आकडेवारी 14 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर या काळातील असून, धीर खचलेल्या शेतकऱ्यांनी थेट जीवनयात्रा संपवण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र आहे.
ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यातील सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात झाल्या आहेत. बीडमध्ये 16, औरंगाबाद- 09, जालना 06, परभणी- 11, हिंगोली- 04, नांदेड - 12, तसेच लातूरमध्ये - 07 व उस्मानाबाद जिल्ह्यात 03 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची असल्याची माहिती समोर आली आहे.