महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद - बैल चोरांच्या दहशतीने बळीराजा त्रस्त; जागून काढावी लागते रात्र - तीस बैलजोड्या चोरीला

मागील पाच महिन्यांपासून माळीवाडा, दौलताबाद, खुलताबाद या परिसरातून जनावरे चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी धारदार शस्त्र हातात घेऊन टोळकी येतात. ही टोळकी गोठ्यातील जनावर चोरून नेतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बैल चोरांच्या दहशतीने बळीराजा त्रस्त

By

Published : Nov 23, 2021, 8:09 PM IST

Updated : Nov 23, 2021, 10:43 PM IST

औरंगाबाद -ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बैल चोरांच्या दहशतीमुळे रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. माळीवाडा - दौलताबाद या भागांमध्ये गेल्या चार महिन्यांत तीस बैलजोड्या चोरीला गेल्याचा (bull thieves in Aurangabad district) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण (farmers suffers from the terror of bull thieve) निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.


मागील पाच महिन्यांपासून माळीवाडा, दौलताबाद, खुलताबाद या परिसरातून जनावरे चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळी धारदार शस्त्र हातात घेऊन टोळकी येतात. ही टोळकी गोठ्यातील जनावर चोरून नेतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीच्या कामांमध्ये बैलाचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे याच बैलजोडीची चोरी होत असल्याने शेतकरी आता जनावरांचे रक्षण करण्यासाठी रात्र जागून काढत आहेत. रात्रीच्या वेळी घरातील सदस्य आळीपाळीने जागी राहतात. इतकेच नाही तर आपल्या शेतात गस्त घालून कोणी आले का नाही, याबाबत चाचपणीदेखील करत आहेत.

बैल चोरांच्या दहशतीने बळीराजा त्रस्त



हेही वाचा-ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

बैल चोरीसाठी आलिशान वाहनांचा वापर...
जनावर चोरी करत असताना चोरट्यांची एक वेगळीच पद्धती पाहायला मिळत आहे. रात्री गोठ्यात कोणी नाही याची चाचपणी केल्यानंतर चोरटे ती जनावरे शेताबाहेर घेऊन जातात. तिथे गेल्यावर एक आलिशान वाहनात या जनावरांना टाकले जाते. त्यामध्ये विशेषत: नव्याने आलेल्या एक्सयूव्ही गाड्यांचा वापर केला जात आहे. या गाड्यांतून जनावरांची वाहतूक करताना पकडले जाण्याची भीती ही कमी असते. ट्रक किंवा एखादा टेम्पो जर असला तर त्यात असलेली जनावरे कोणाच्याही नजरेस पडू शकतात. त्यामुळे अशा आलिशान वाहनांच्या मागील सीट काढून जनावर त्यात टाकून चोरण्याची वेगळी पद्धत चोरट्यांनी (Aurangabad crime news) अवलंबत आहेत. त्यामुळे जनावेर चोरल्यावर ती नेमकी कुठे जात आहेत याचा थांगपत्ताही लागत नाही.

हेही वाचा-अजित पवार ४८ तासांसाठी 'दुल्हे' झाले होते - असदुद्दीन ओवेसींचा राष्ट्रवादीवर निशाणा



हल्ला होण्याच्या भीतीने शेतकरी भयभीत.....
ग्रामीण भागांमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. घरांवरही हल्ले करून चोर डल्ला मारत आहेत. त्यात शेतामध्ये जनावरांचा रक्षण करण्यासाठी जर कोणी थांबले तर ही टोळी हातात शस्त्र घेऊन हल्ला करून जिवे मारू शकतात. त्यामुळे शेतकरी आपल्या जनावरांचा रक्षण करण्यासाठी टोळक्यांनी पहारा देण्यासाठी उभा राहत आहे. हल्ला झाला तर जीव जाण्याची भीती ही शेतकऱ्याला वाटत आहे. त्यामुळेच आता चोरट्यांपासून पासून जनावरांचे आणि स्वतःचे रक्षण कसे करायचे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.

हेही वाचा-रेल्वे खासगीकरणाच्या रुळावर? रेल्वे चालविण्याकरिता केंद्राने खासगी कंपन्यांकडून मागविले अर्ज

पोलीस मदत करत नसल्याचा आरोप
जनावरे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांनी (cattles theft cases in Aurangbad) पोलिसात धाव घेतली. मात्र तिथे गेल्यावर पोलिस प्रतिसाद मिळत नाही. कुठलाही पद्धतीचा तपास करत नसल्याची शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. पोलीस ठाण्यात जाताच तेथील कर्मचारी आणि अधिकारी शेतकऱ्यांना हाकलून देतात. तक्रार नोंदवून घेत नाहीत. इतक्या बैलजोड्या चोरी होऊनही पोलीस साधे गस्तही घालायला येत नाहीत, अशा पद्धतीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे रक्षण करणारे पोलिसच जर साथ देत नसतील तर आमचे रक्षण करणार कोण ?असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर याबाबत पोलिसांनी सावध भूमिका घेतली आहे. जनावरे आपल्या गोठ्यात न बांधता घराजवळ बांधावी किंवा गोठ्याजवळ कोणीतरी रात्री झोपावे, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Last Updated : Nov 23, 2021, 10:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details