अमरावती -कोरोनामुळे मध्यंतरी दोन महिने कापूस खरेदी थांबली होती. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात ९ कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी सुरू झाली. मात्र, शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या शेतकऱ्यांना कापूस विक्री करण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. माहुली जहागीर येथील जिनिग प्रेसिंगमध्ये कापूस विकायला आणलेल्या शेतकऱ्यांनी रात्रभर प्रतीक्षा करूनही लवकर कापूस खरेदी केला जात नसल्याचे समोर आले आहे.
अमरावतीमध्ये कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांचा अंधाराशी संघर्ष - amravati cotton market
जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख २३० शेतकऱ्यांचा १३ लाख १३ हजार २०२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ४ हजार ९६ शेतकऱ्यांची १ लाख क्विंटल कापसाची खरेदी अद्यापही बाकी आहे. एकीकडे पेरणी होऊन एक महिना उलटला आहे.
जिल्ह्यामध्ये कापूस खरेदी केंद्र कमी असल्यामुळे कापूस उत्पादकांना दोन-दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ज्या ठिकाणी शेतकरी थांबतात त्या ठिकाणी ना पाणी, ना वीज, ना झोपायला कुठलीच व्यवस्था. भर पावसाळ्यात आकाशाला छत्र मानून शेतकरी जीव मुठीत घेऊन रात्र काढताना पाहायला मिळत आहे. अमरावती जिल्ह्यात सध्या एकूण ९ कापूस खरेदी केंद्र आहेत. ज्यामध्ये सीसीआयचे २, कापूस पणन महासंघाचे ७ केंद्र आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख २३० शेतकऱ्यांचा १३ लाख १३ हजार २०२ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. ४ हजार ९६ शेतकऱ्यांची १ लाख क्विंटल कापसाची खरेदी अद्यापही बाकी आहे. एकीकडे पेरणी होऊन एक महिना उलटला आहे. मात्र कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांचा वेळ जात आहे.