महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Farmers Compensation : स्मशानभूमीत भाजलेली भाकरी खाऊन शेतकऱ्यांनी केली दिवाळी साजरी

देशात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने व थाटामाटाने साजरा होत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालूक्यातील वाहेगाव येथील शेतकरी मात्र आपली दिवाळी स्मशानभूमीत भाजी भाकरी खाऊन साजरी करत ( Farmers celebrate Diwali eating bhakri made in Cemetery )आहेत.

Farmers celebrate Diwali
स्मशानभूमीत भाजली भाकरी

By

Published : Oct 24, 2022, 6:53 PM IST

गंगापूर (औरंगाबाद) : देशात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने व थाटामाटाने साजरा होत असताना औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालूक्यातील वाहेगाव येथील शेतकरी मात्र आपली दिवाळी स्मशानभूमीत भाजी भाकरी खाऊन साजरी करत ( Farmers celebrate Diwali eating bhakri made in Cemetery )आहेत. परतीच्या पावसाने गंगापूर तालूक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारकडून कोणतेही मदत अद्याप शेतकऱ्यांना झालेली नसून ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई ( Farmers demand for compensation ) द्या या मागणीसाठी वायगाव येथील शेतकऱ्यांनी स्मशानभूमीत भाजी भाकरी खाऊन शेतातील नुकसान झालेल्या पिकाचे लक्ष्मीपूजन केले ( Lakshmi Pujan Of Damaged Crops ) आहे.

स्मशानभूमीत भाजेली भाकरी खाऊन शेतकऱ्यांची दिवाळी

शेतकऱ्यांची सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी :सरकारने आमच्याकडे कुठल्याही प्रकारचा लक्ष दिलेले नाही पंचनामे नुकसान भरपाई आम्हाला मिळालेली नाही त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी मुलांना कपडे फटाके दिवाळीचा फराळ करण्यासाठी शेतकऱ्याकडे एक रुपयाही खिशात शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे शासनाच्या निषेधार्थ दिवाळी स्मशानभूमीतच साजरी करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे हेक्टरी 50 हजार रुपये भरपाई देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करावा सरकारने मागणे मान्य केल्या नाही तर कृषी मंत्री यांच्या घरासमोर व मंत्रालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा वाहेगाव येथील शेतकऱ्यांनी दिला आहे याच शेतकऱ्यासोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी रामेश्वर अमृते यांनी

ABOUT THE AUTHOR

...view details