औरंगाबाद- येथील सिल्लोडमध्ये सततच्या पावसामुळे पाच एकरातील कापून ठेवलेली सोयाबीन शेतकऱ्याने नाईलाजास्तव पेटवून दिली आहे. उसनवारी करुन केलेला शेतीसाठी खर्चामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याचे या पावसामुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. दिगंबर वाघ असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
औरंगाबादमध्ये पाच एकरातील सडलेली सोयाबीन शेतकऱ्याने दिली पेटवून
सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन सडली. यामुळे जमा केलेल्या सोयाबीन मधून दुर्गंधीयुक्य वास येवू लागला. त्यामुळे जनावरांच्या सुद्धा खाण्यालायक सोयाबीन राहिली नाही. यामुळे शेतीचे पूर्ण नुकसान झाले.
सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन सडली. यामुळे जमा केलेल्या सोयाबीन मधून दुर्गंधीयुक्य वास येवू लागला. त्यामुळे जनावरांच्या सुद्धा खाण्यालायक सोयाबीन राहिली नाही. यामुळे शेतीचे पूर्ण नुकसान झाले. जनावरे सोयाबीन खातील तर विषबाधा होईल म्हणून शेतकऱ्याने अखेर सोयाबीन जागीच पेटवून दिली. जवळपास 70 हजार रुपये खर्च करुन सोयाबीन पेटवून देण्याचे कारण सांगताना दिगंबर वाघ भावुक झाले होते. आता सरकारने जास्त अंत न पाहता सर्व शेतकऱ्यांना विनाअट नुकसानभरपाई देण्याची त्यांनी मागणी केली.
दिगंबर वाघ यांनी खरिपात 5 एकरात सोयाबीन लागवड केली. खत, कीटकनाशके फवारणी केली. सोयाबीन कापणीत आल्याने त्यांनी सोयाबीन कापून ठेवले. त्यांनतर सतत पाऊस सुरू झाला. सोयाबीन हातची गेली पण काहीतरी हाती लागेल अशी आशा त्यांना होती. पावसाने 2 दिवस उघडीप दिल्याने त्यांनी सोयाबीन जमा केली खरी पण त्यात काही प्रमाणात असलेले दाणे सडले. यात काहीही मिळणार नाही. शिवाय ही सोयाबीन जनावरांना खायला दिली. तर जनावरांना विषबाधा होऊ शकते त्यामुळे दिगंबर वाघ यांनी सोयाबीन पेटवून दिली.