औरंगाबाद-शेतात कपाशीच्या पिकावर फवारणी करीत असताना शेतकऱ्याचा विषबाधेने मृत्यू झाल्याची घटना खुलताबाद तालुक्यातील आखात वाडा तांडा भागात घडली. सुरेश देविदास राठोड (वय-40, रा. खुलताबाद) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
औरंगाबाद- आखात वाडा तांडा येथे फवारणी करताना विषबाधेने शेतकऱ्याचा मृत्यू - khutabad
सुरेश देविदास राठोड (वय-40, रा. खुलताबाद) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घरातील कमावता माणूस गेल्याने राठोड परिवारावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मृत सुरेश देविदास राठोड
राठोड यांच्या शेतात कपाशीचे पीक होते. पिकावर रोग पडू नये व उगवलेले पीक वाया जाऊ नये, यासाठी राठोड हे पिकावर फवारणी करीत होते. मात्र, काही वेळाने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. ही गोष्ट लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात हलविले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी राठोड यांचा मृत्यू झाला. घरातील कमावता माणूस गेल्याने राठोड परिवारावर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.