महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

वडिलांच्या नावाने पन्नास हजारांचे कर्ज. व्यवसायामुळे कर्जात आणखी भर पडली.त्यामुळे कर्जाला कंटाळून औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील जेहूर येथील शेतकऱ्याने गळफास घेत आत्महत्या केली.

मृत दिलीप पवार
मृत दिलीप पवार

By

Published : Jan 29, 2020, 8:18 AM IST

औरंगाबाद- कर्जाला कंटाळून जेहूर (ता. कन्नड) येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिलीप श्रीहरी पवार (वय 38 वर्षे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


मृत दिलीप यांच्या वडिलांच्या नावावर पन्नास हजार रुपयांचे कर्ज होते. मागील वर्षी सततच्या दुष्काळामूळे उत्पन्नामध्ये मोठी घट झाली होती. त्यातच दिलीप पवार हे वर्ष भरापूर्वी कापसाचा व्यापार करीत होते. व्यापारातही त्यांना कर्ज झाले होते. त्यामुळे झालेल्या कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे नातेवाईक गीताराम पवार यांनी दिली.

मतृ दिलीप यांच्यावर कन्नड येथील प्राथामिक आरोग्य केंद्रामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.

हेही वाचा - देवगाव रंगारी येथे बस व मोटारसायकलचा अपघात; एक ठार, एक गंभीर

याबाबत देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक संजय आहिरे यांनी दिली. पुढील तपास पोलीस शिपाई सूदाम साबळे करत आहेत. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मूलगा, एक मूलगी असा परीवार आहे. कन्नड पंचायत समीतीचे माजी उपसभापती गीताराम पवार यांचे ते चूलत भाऊ होते.

हेही वाचा - बनावट कागदपत्रांद्वारे चोरलेल्या ट्रकचे हस्तांतर, सहाय्यक परिवहन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details