औरंगाबाद- नापिक व सततच्या दुष्काळामुळे हैराण झालेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याने आज सोमवारी विषारी रसायन पिऊन आत्महत्या केली. विठ्ठल बाबासाहेब नवले (वय 55), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
नापिक व सततच्या दुष्काळामुळे हैराण होऊन शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या
विठ्ठल बाबासाहेब नवले (वय 55), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
विठ्ठल नवले हे औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील औरंगपूर गावातील रहिवासी होते. त्यांच्यावर ग्रामीण बँकेचे एक लाख रुपये आणि काही उसनवारीचे कर्ज होते. त्यातच नापिकी व दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी विषारी रसायन पिले. त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यासाठी, मोठे संकट असल्याचे दिसून येते. सरकार उपाय योजना करत असल्याचे सांगत आहे. मात्र, त्या उपाय योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने आत्महत्या वाढत आहेत का? हा प्रश्न आहे.