महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवना नदीच्या महापुरात शेतकऱ्याची विहीर गेली वाहून, बंधाऱ्यांनाही फटका - औरंहगाबादमध्ये महापूर

शिवना नदीला आलेल्या महापुरामुळे सिरजगाव येथील शेतकरी गोरखनाथ काळे यांची नदीलगत असलेली विहीर पाण्यात वाहुन गेली आहे. तसेच नदी काठच्या शेती पिकांचेही मोठ्या ्प्रमाणात नुकसान झाले आहे.

शिवना नदीला पुर आल्याने नदी लगत असलेली विहीर गेली वाहून
शिवना नदीला पुर आल्याने नदी लगत असलेली विहीर गेली वाहून

By

Published : Sep 9, 2021, 1:27 PM IST

गंगापूर(औरंगाबाद) -शिवना नदीला पूर आल्याने नदी लगत असलेली विहीर वाहून गेल्याची घटना घडली आहे. शिवना नदीच्या पाणी पातळी वाढ झाल्याने महापुराची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गंगापूर तालुक्यात शिवना नदीवरील चार बंधाऱ्यांच्या बाजूचे भराव फुटले. त्यामुळे नदी काठच्या अनेक गावाला पुराचा तडाखा बसला आहे. या पुराच्या पाण्यात नदी काठच्या शेतातील विहिरीचा कठडा वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

शेतकऱ्याची विहीर गेली वाहून,
गंगापूर लासुर महामार्ग वाहतुकीसाठी आठ तास बंद-गंगापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शिवना नदीच्या पट्ट्यातील शेतीपाण्याखाली गेली आहे. तसेच शिवना गंगापूर ते लासुर स्टेशन महामार्गावर असलेल्या पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे या महापुरात सिरजगाव येथील शेतकरी गोरखनाथ काळे यांची नदीलगत असलेली विहीर पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे भराव फोडून नदीचे पाणी शेतामध्ये शिरले. त्याचवेळी काळे यांची नदीच्या किनाऱ्याला लागून बांधण्यात आलेली सिमेंट रिंगचा विहिरीचा कठडा वाहून गेला आहे.

या पुरामुळे नागरी वस्तीत नदीचे पाणी शिरल्यास धोका निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेत नदी काठावरील अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मात्र या महापुरामुळे काठावरील शेतांमध्ये पाणी शिरून कपाशी, ऊस, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details