महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची', प्रदर्शनी बसचे औरंगाबादेत आगमन - फिरते प्रदर्शन

'वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची' हे फिरते प्रदर्शन आज औरंगाबाद बस स्थानकात दाखल झाले.

'वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची', प्रदर्शनी बसचे औरंगाबादेत आगमन

By

Published : Jul 25, 2019, 6:33 PM IST

औरंगाबाद- 'वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची' हे फिरते प्रदर्शन आज औरंगाबाद बस स्थानकात दाखल झाले. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून एसटीचे किती महत्त्व आहे, याची जाणीव लोकांना व्हावी, म्हणून हे प्रदर्शन सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांनी या प्रदर्शनी बसचे उत्साहात स्वागत केले.

'वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची', प्रदर्शनी बसचे औरंगाबादेत आगमन

वारी लाल परीची, गाथा नव्या युगाची' ही प्रदर्शन बस सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. त्यासाठी 'बस फॉर अस फाउंडेशन'ला एसटीकडून बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. 1 जून 2019 ला एसटीने 72 व्या वर्षात पदार्पण केले. त्याचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरूवारी मुख्य बस स्थानकांवर हे फिरते चित्रप्रदर्शन भरिवण्यात आले होते.

सडा-रांगोळी काढून या चित्ररथाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. एसटीत झालेले बदल या बसमध्ये एसटीप्रेमींच्या मदतीने पोस्टर्सच्या माध्यमातून उलगडले आहेत. बसच्या आत आणि बाहेरही ही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. एमएस बांधणीच्या बस, शिवशाही, स्लीपर बस, पंढरीच्या वारीची विठाई बस, विविध मॉडेलच्या बांधणीची वैशिष्ट्ये, मजबुती यासह एसटीच्या विविध योजनांबद्दलही यात माहिती देण्यात आली आहे.

कोणत्याही आंदोलनात एसटीला लक्ष्य केले जाते. तसे होऊ नये, यासाठी जागृतीपर संदेशही देण्यात आले आहेत. एसटी बसच्या मॉडेलमध्ये 1948 पासून कसे बदल होत गेले, याचा प्रवासही छायाचित्रांमधून उलगडतो. एसटीकडे राज्यभरात किती बसेस आहेत, किती कर्मचारी काम करतात, एसटीचा पसारा किती व्यापक आहे, याची माहितीही देण्यात आली आहे. एसटी बसच्या नव्या मॉडेल्सच्या प्रतिकृतीही प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. हे फिरते चित्रप्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मोफत खुले ठेवण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details