महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Devendra Fadnavis : कर्नाटकात आम्ही हरलो तरी आमचा निवडून येण्याचा रेट चांगला- देवेंद्र फडणवीस

देशात निवडणुका होतात. काही वेळा आम्ही जिंकतो आणि काही वेळा हारतो; मात्र आमचा निवडून येण्याचा रेट इतर पक्षांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (शनिवारी) छत्रपकती संभाजी नगर येथे केले.

By

Published : May 14, 2023, 4:32 PM IST

Fadnavis On BJP Defeat In Karnataka
देवेंद्र फडणवीस

कर्नाटक निवडणुकीतील भाजप पराभवावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): इतर राज्यांमध्ये निवडून येण्याचे कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर लोकांचा विश्वास आहे. कधी-कधी स्थानिक ठिकाणी अशा अडचणी तयार होतात. ज्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

'त्या' प्रश्नावर बोलणे टाळले: उद्धव ठाकरे यांना धडा शिकवण्यासाठी 2019 चा तो शपथविधी होता, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. मात्र, ते काय बोलले हे ऐकले नाही, असे उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिले.


'ईव्हीएम' बाबत मूर्खपणा:भाजपला जिंकायचे असते त्या ठिकाणी 'ईव्हीएम' मशीन बदलल्या जातात आणि त्यामुळे भाजपला तिथे चांगले बहुमत मिळते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्यावर बोलताना यापेक्षा मोठा मूर्खपणा काय असू शकतो, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. असे आहे तर हे कालच्या निवडणुकीत मग भाजपने का नाही केले? काही लोकांना मूर्खासारखे बोलायची सवय झाली आहे. आमच्या पराभवाचे विश्लेषण आम्ही करू. ते करण्यासाठी आम्हाला दुसरा कोणी नको असा, सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

फडणवीसांनी सांगितले पराभवाचे कारण: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसने 224 पैकी 136 जागा जिंकत मोठा विजय मिळवला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात पत्रकारांशी बोलताना कर्नाटकातील भाजपच्या पराभवाचे कारण सांगितले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून राज्यात भारतीय जनता पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'जेडीएसची पाच टक्के मत काँग्रेसला': पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकात 1985 पासून कुठलेच सरकार पुन्हा सत्तेवर आले नाही. यावेळी आम्ही तो ट्रेंड मोडू असा आम्हाला विश्वास होता, मात्र ते शक्य झाले नाही. ते म्हणाले की, 2018 मध्ये आम्हाला 36 टक्के मतं मिळाली होती, यावेळी आम्हाला 35.6 टक्के मतं मिळाली आहेत. आमची फक्त अर्धा टक्के मतं कमी झाली, मात्र आमच्या जवळपास 40 सीट कमी आल्या आहेत. 2018 मध्ये जेडीएसला 18 टक्के मतं मिळाली होती. यावेळी त्यांची जवळपास 5 टक्के मतं कमी झाली आणि ही मते कॉंग्रेसला मिळाली आहेत. त्यामुळे कॉंग्रेसला हा विजय मिळाला आहे. भाजपची मते कुठेही कमी झाली नाही.

हेही वाचा:

  1. Nitesh Rane criticize Sanjay Raut : '..म्हणून संजय राऊतांनी महाविकास आघाडी सरकार पाडले', नितेश राणेंचा गंभीर आरोप
  2. Raj Thackeray Taunt BJP : कर्नाटक निवडणुकीत 'भारत जोडो' यात्रेचा परिणाम; राज ठाकरेंचा भाजपला टोला
  3. UP Municipal Election: बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या असत्या तर आमचा विजय झाला असता -मायावती

ABOUT THE AUTHOR

...view details