महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, आंबादास दानवेंची टीका - Chief Minister Eknath Shinde

विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक खोचक ट्विट केलं आहे. ज्यामधे रोहियो मंत्री आमदार संदीपान भुमरे यांच्या सभेत खुर्च्या रिकाम्या असल्याचा व्हिडिओ असून त्यात गद्दार असा उल्लेख करत खिल्ली उडवली आहे.

संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या
संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या

By

Published : Aug 27, 2022, 8:02 PM IST

औरंगाबाद -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे हे नव्याने मंत्रीपदी विराजमान झाल्यावर त्यांच्या पैठण मतदार संघात त्यांचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गर्दी होईल अशी अपेक्षा असताना अनेक खुर्च्या रिकाम्या राहिल्या. गर्दी नसल्याने सकाळी दहा वाजता कार्यक्रम संध्याकाळी चार वाजता सुरु झाला. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावरून जोरदार टीका सुरू केली. इतकेच नाही तर सोशल मीडियावर कार्यक्रम स्थळाच्या रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओ टाकून गद्दार अशी पोस्ट व्हायरल केली आहे. अशीच काहीशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट केले असून सध्या त्या पोस्टची चर्चा सर्वत्र दिसून येत आहे.

संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या

हा होता कार्यक्रमशिवसेना वैधकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त, पैठण शहरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मंत्रीपद मिळाल्यावर संदीपान भुमरे हे पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमा निमित्ताने पैठण येथे येणार होते. तशी जय्यत तयारी देखील करण्यात आली होती. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होईल अशी अपेक्षा होती. कार्यक्रमाची वेळ सकाळी दहा वाजेची ठेवण्यात आली होती. मात्र, दुपारपर्यंत कार्यक्रमस्थळी मोजकेच लोक आल्याने संदीपान भुमरे हे पोहोचले नाहीत. शेवटी चार वाजेच्या दरम्यान भुमरे कार्यक्रम स्थळी आले आणि मोजक्याच लोकांच्या समोर त्यांनी भाषण केले.

संदीपान भुमरे यांच्या कार्यक्रमावर दानवे यांचे ट्विट

हेही वाचा -सोनाली फोगटचा नवा व्हिडीओ आला समोर, क्लबमध्ये मिळत होते ड्रग्ज, पहा सीसीटीव्ही फुटेज

ABOUT THE AUTHOR

...view details