औरंगाबाद:खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आपल्याला मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप केला. मात्र सहानुभूती मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतला दिलेली धमकी हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी, तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट आहे. याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांची टिका:धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली. निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे. खरी शिवसेना आमच्याकडेच आहे, असे एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. आमच्या बाजूने निर्णय आल्याने उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेत असल्याने ते घाबरलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर आरोप करत आहे. आम्ही कामाने उत्तर देऊ, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले: वर्णनात्मक परीक्षा पद्धत २०२५ पासून लागू करावी याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला. मात्र, अद्याप महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे साेमवारी २० राेजी एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले. झाशीची राणी लक्ष्मीबाई चाैकात एकत्र जमून त्यांनी धरणे आंदाेलन केले. जाेपर्यंत एमपीएससी वर्णनात्मक परीक्षेबाबत निर्णय घेणार नाही, ताेपर्यंत आमरण उपाेषणाला सुरुच राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे.