महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संस्था चालकाचा शिक्षिकेवर तीन वर्षे अत्याचार; अश्लिल फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी - physically abusing news

भोकरदनमधील संस्था चालकाने, आई-वडिलांच्या भेटीसाठी आलेल्या शिक्षिकेला आपल्या पत्नीने भेटायला बोलावल्याची बतावणी करुन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर अश्लिल फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या शिक्षिकेवर तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून पीडित शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, शिक्षिकेच्या पतीने धीर दिल्यामुळे सोमवारी शिक्षिकेने सिडको पोलिसात तक्रार दिली.

Institution Director accused of physically abusing and blackmailing female teacher for past three years
संस्था चालकाचा शिक्षिकेवर तीन वर्षे अत्याचार; अश्लिल फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

By

Published : Aug 17, 2020, 10:27 PM IST

औरंगाबाद - भोकरदनमधील संस्था चालकाने, आई-वडिलांच्या भेटीसाठी आलेल्या शिक्षिकेला आपल्या पत्नीने भेटायला बोलावल्याची बतावणी करुन तिच्यावर अत्याचार केल्यानंतर अश्लिल फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्या शिक्षिकेवर तीन वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून पीडित शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, शिक्षिकेच्या पतीने धीर दिल्यामुळे सोमवारी शिक्षिकेने सिडको पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी संस्था चालक काकासाहेब शामराव मुरकुटे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकरदन तालुक्यातील ३१ वर्षीय शिक्षिकेचे आई-वडिल सिडकोतील एन-५ भागात राहतात. त्यांना भेटण्यासाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये शिक्षिका आली होती. त्यावेळी भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे राहणारा शिक्षण संस्था चालक काकासाहेब मुरकुटे याने पत्नीच्या मोबाईलवरुन शिक्षिकेशी संपर्क साधला. त्याने आपल्या पत्नीने तुला भेटायला बोलावल्याची थाप मारली. शिक्षिका घरी गेली, त्यावेळी मुरकुटेची पत्नी तिथे नव्हती. त्याचा गैर फायदा घेत मुरकुटेने तिचे फोटो काढत घराचा दरवाजा बंद केला. त्यानंतर तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचाराचे फोटो व व्हिडीओ त्याने तयार केले. त्या आधारे त्याने शिक्षीकेला वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. हा प्रकार सुरू असतानाच त्याने शिक्षिका व तिच्या शिक्षक पतीशी विनाकारण वाद घालून दाम्पत्याला शाळा सोडण्यास सांगितले. त्यानंतर आपणच शाळा सुरू करत असल्याचे म्हणत त्याने भागिदारीसाठी वीस लाखांची मागणी केली. आर्थिक परिस्थिती नसताना देखील पीडितेने त्याला १४ तोळे सोने व नातेवाईकांकडून दहा लाख रुपये घेत पैसे दिले. यावेळी शिक्षिकेच्या पतीला करारनामा करुन देतो, असे संस्था चालकाने सांगितले.


पुढे जून-जुलै २०१९ मध्ये त्याने केदारखेडा येथे छत्रपती पब्लिक स्कूल थाटली. त्यानंतर त्याचा आणखीनच त्रास वाढला. फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने अनेकदा शिक्षिकेचा लैंगिक अत्याचार केला. अखेर त्रास असहाय्य झाल्याने पीडित शिक्षिकेने घडलेला प्रकार पतीला सांगितला. या प्रकारावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तेव्हा पीडित शिक्षिकेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पतीने तिला विश्वासात घेऊन धीर दिला. त्यानंतर सोमवारी पीडितेने सिडको पोलीस ठाण्यात संस्था चालक काकासाहेब मुरकुटे याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर अवघड करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details