औरंगाबाद -सकाळी-सकाळी सगळ्यांची चांगलीच लगबग सुरू. आज लग्नअसल्यामुळे घरात आनंदाच वातावरण. घरा-दारात नातेवाईक, मित्र आतेष्टांचा गलका सुरू. मात्र, त्याचे कोण मालक! त्याच्या मनात आले आणि त्याने केली सुरुवात धो-धो कोसळायला. मध्यरात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. मग काय, लग्नाच्या पुर्वसंध्येला गैरसोय होईन म्हणून जरा सगळेच हिरमुडले. दरम्यान, या पावसामुळे गाव अन् मुख्य रस्त्याचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नवर देवासह वऱ्हाडी मंडळींनी धरली चिखलातून वाट. ही वाट तीन किलोमिटरची. हे चित्र आहे औरंगाबाद जिल्ह्यातील दावरवाडी तांडा येथील. पहा नवरदेवाचा व्हिडीओ ईटीव्ही भारतवर-
नवरदेवाची तीन किलोमीटर चिखलातून पायपीट, ईटीव्ही भारत'वर पहा व्हिडीओ - Navradeva in aurnagabad district
मध्यरात्रीपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली. मग काय, लग्नाच्या पुर्वसंध्येला गैरसोय होईन म्हणून जरा सगळेच हिरमुडले. दरम्यान, या पावसामुळे गाव अन् मुख्य रस्त्याचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींनी धरली चिखलातून वाट. ही वाट तीन किलोमिटरची. हे चित्र आहे औरंगाबाद जिल्ह्यातील दावरवाडी तांडा येथील. पहा नवरदेवाचा व्हिडीओ ईटीव्ही भारतवर-
नवरदेवासह वऱ्हाडाची चांगलीच तारांबळ
दावरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत तांडागाव मुख्य गाव आणि सोनवाडीपासून तीन किलोमिटर अंतरावर पस्तीस उंबऱ्याची वस्ती आहे. तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने लग्नाचा बार उडवून द्यावा म्हणून शेषराव राठोड यांनी त्यांचा मुलगा अमोल याचा विवाह मंगळवारी सुखापूरी ता.अंबड येथे करण्याचे ठरवले. यासाठी सर्व नातेवाईक-मित्र आप्तेष्टांना बोलविण्यात आले. वऱ्हाड नेण्यासाठी वाहन लावण्यात आले. मात्र, लग्नाच्या आदल्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नवरदेवासह वऱ्हाडाची चांगलीच तारांबळ झाली.