छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)Drunk youth raped:दारूच्या नशेत तर्र झालेल्या युवकाने ८५ वर्षीय वृध्द महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यात उघडकीस आली आहे. मृत आजी घरात एकट्या असताना मंगळवारी मध्य रात्री २४ वर्षीय युवक घरात घुसला. तसंच त्याने माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य केलं. आरोपी गुलाब बेलदार याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर वृध्द महिला देखील सुरक्षित नसल्याचा रोष व्यक्त केला जातोय. पोलीस अधिक तपास करत आहेत.
आरोपी आला होता बहिणीला भेटायला - आरोपी गुलाब बेलदार हा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील भोजे चिंचपुरे येथील रहिवासी आहे. तो आपल्या बहिणीला भेटण्यासाठी वैजापूर तालुक्यातील लोणीखुर्द येथे आला होता. त्याच ठिकाणी समोर ८५ वर्षीय आजी एकट्या राहत असल्याचं त्याने पाहिलं. दिवसभर त्यांच्यावर पाळत ठेवली आणि रात्री दीडच्या सुमारास आजी झोपलेल्या असताना घरात घुसला. झोपेत असलेल्या आजीवर त्याने अतिप्रसंग केला. त्यानंतर त्याने अजीचे डोके भिंतीवर आपटले आणि साडीने गळा आवळला. त्यात अजीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र झटापटीत आरोपीच्या डोक्याला देखील मार लागला.
हत्या करून नागरिकांमध्ये जाऊन राहिला उभा - आजीवर अत्याचार करून हत्या केल्यावर आरोपी गुलाब बेलदार याने चोर घुसल्याचा बनाव केला. आजीसोबत झटापट सुरू असताना झालेल्या आवाजाने शेजारी आजीच्या घराजवळ आले. त्यावेळी चोर आले होते, त्यांनी आजीला मारलं आणि मलाही जखमी करून पळ काढल्याचं सांगत नागरिकांमध्ये जाऊन उभा राहिला. पोलिसांनी घटनाक्रम समजून घेतल्यानंतर आरोपीवर पोलिसांना संशय आला. त्यानुसार त्याला ताब्यात घेतल्यानंतर घडलेला धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल असून, या मग दुसरं काही कारण आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर परिसरात रोष व्यक्त केला जातोय. समाजात मुली सुरक्षित नाहीत अस म्हटलं जात असताना आता वृध्द महिला देखील सुरक्षित नाहीत का? असा प्रश्न उपस्थितीत केला जातोय.