औरंगाबाद -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मोहिते यांनी ड्रोन कॅमेरे कन्नड पोलिसांना वापरण्यासाठी मोफत उपलब्ध करून दिले आहेत.
प्रशासनाने अनेक उपाययोजना करून,पोलिसांनी कडक भूमिका घेऊनही लॉकडाऊनच्या काळात नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. पोलीस रऊंडवर आले की नागरिक घरात पळून जातात. पोलीस गेले की, परत बाहेर येणारे व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर होणार असून नागरिकांनी घरातच थांबण्याचे आवाहन बाबासाहेब मोहिते व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर रेंगे यांनी केले आहे.