औरंगाबाद- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आज डी. लिट. पदवी प्रदान ( D Litt Degree to Nitin Gadkari Sharad Pawar ) केली.
Convocation Ceremony : नितीन गडकरी, शरद पवार यांना मराठवाडा विद्यापीठाची डीलिट पदवी प्रदान - शरद पवार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आज डी. लिट. पदवी प्रदान ( D Litt Degree to Nitin Gadkari Sharad Pawar ) केली. आज झालेल्या पदवीप्रदान समारंभामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान - आज झालेल्या पदवीप्रदान समारंभामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठ प्रशासनाने यापूर्वीच हा प्रस्ताव कुलपती तथा राज्यपालांकडे पाठवला होता. राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेनेही त्यास सहमती दर्शवली. त्यानंतर अधिसभा बैठकीत हा प्रस्ताव मंजुरी करण्यात आला. आज त्यांना ही पदवी देण्यात आली.
62 दिक्षांत समारंभ - विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ आयोजिक करण्यात आला होता. विद्यापीठाच्या जवळपास 1.05 लाख विद्यार्थ्यांनी यावर्षी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि डॉक्टरेट मिळवली आहे, अशी कुलगुरूंनी माहिती दिली.