औरंगाबाद -औरंगाबाद शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शहराचे नामांतर करुन संभाजीनगर करण्यात यावे, अशी मागणी करणाऱ्यांनी सांगावे संभाजी महाराज आणि औरंगाबाद शहराचा काय संबंध? शहरासाठी पाणी प्रश्न गंभीर आहे. अशात औरंगाबादच्या नागरिकांना पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का? असा सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सुभेदारी विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत विचारला.
औरंगाबादकरांना पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का? -अॅड.प्रकाश आंबेडकर - prakash ambedkar latest news
औरंगाबाद शहराचा नामकरण मुद्दा राज्यभर गाजत असताना प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद संभाजीनगर या प्रश्नावर सूचना केली. या नामांतर मुद्द्यावर नागरिकांना काय वाटते, यासाठी औरंगाबाद नावावर शहरवासीयांचे मतदान घ्या.

पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा
औरंगाबादकरांना पाण्यापेक्षा नामकरणाचा मुद्दा महत्त्वाचा