महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लासुरगावात कंटेन्मेट झोन; जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन घेतला आढावा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाम यांची भेट

लासुरगावमध्ये कोरोनाचे एकूण 22 रुग्ण सापडले असून 2 रुग्ण होम आयशोलन मध्ये आहेत. येथील कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चव्हाण आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची सक्तपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

लासुरगावात कंटेन्मेट झोन;
लासुरगावात कंटेन्मेट झोन;

By

Published : Mar 22, 2021, 7:11 AM IST

Updated : Mar 22, 2021, 7:44 AM IST

गंगापूर(औरंगाबाद) - कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रविवारी लासुरगावला भेट देऊन आरोग्य उपकेंद्राची पाहणी केली. या दरम्यान त्यांनी आणि पथकाने येथील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या परिसराची पाहणी करत त्यास कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याच्या सूचना केल्या. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.

लासुरगावात कंटेन्मेट झोन
वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाबलासुरगावमध्ये कोरोनाचे एकूण 22 रुग्ण सापडले असून 2 रुग्ण होम आयशोलन मध्ये आहेत. येथील कोरोना बाधितांची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी चव्हाण आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची सक्तपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करून सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच प्रसारमाध्यमांनी कोरोनाबाबत जनजागृती करावी असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आरोग्य अधिकारी, आरोग्यसेविका यांच्या कार्यबद्दल प्रसंशा करून सर्वांनी काळजी घेण्याची सूचना दिली.या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्यासह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती, एस.डी.एम.माणिक आहेर, गंगापूरचे तहसीलदार अविनाश शिंगटे, वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड, वैद्यकीय अधिकारी विलास डुकरे, सुनीता दौड आदिंची उपस्थिती होती.
Last Updated : Mar 22, 2021, 7:44 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details