औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील जवळी (बुर्दुक) येथील एका व्यक्तीचा विटा शिवारातील अशोक रंगानाथ हार्दे यांच्या शेतातील विहिरीत पाण्यात पडल्याने बडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. कैलास साहेबराव हार्दे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू - Bank branch officer dies after falling into well
कन्नड तालुक्यातील जवळी येथील एका व्यक्तीचा विटा शिवारातील विहिरीत पडल्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
![जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाधिकाऱ्यांचा विहिरीत पडून मृत्यू district-central-bank-branch-officer-dies-after-falling-well-in-vita-shivara-kannada-taluka](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6979531-557-6979531-1588091035965.jpg)
याबाबत पोलिसांनी दिलेले माहिती अशी की, कैलास हार्दे अनेक वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शाखा अधिकारी पदावर कार्यरत होते. ते अनेक दिवसांपासून कन्नड येथे राहत होते. मात्र, दोन दिवसापासून ते आपल्या जवळी बूर्दुक या मूळगावी आले होते. त्यांचा मृतदेह मंगळवारी दुपारी १ च्या सुमारास त्यांच्या शेतालगत असलेल्या अशोक हार्दे यांच्या विहिरीत आढळला. देवगाव रंगारी पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून विहीरीतून मृतदेह बाहेर काढुन औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठला.
वैद्यकीय अधिकारी प्रदिप कांबळे यांनी शवविच्छेदन करून शवविच्छेदन चा अवहाल व मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. सायंकाळी ६ वाजता त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुल, दोन मुली, जावाई असा मोठा परिवार आहे. देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक संजय अहिरे करत आहेत.