औरंगाबाद : खासदार इम्तियाज जलील यांच्यावर पुन्हा एकदा चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला ( Dissipate Notes On Imtiaz Jalil ) आहे. आमखास मैदानावर आयोजित कव्वालीच्या कार्यक्रमात इम्तियाज जलील आणि त्यांचा मुलगा बिलाल यांच्यावर नोटा उधळण्याचा ( Amkhas Maidan Qawwali program ) आल्या.
त्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. खा. जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या. तसाच प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.