महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विकृतीचा कळस! बसचालकाकडून मुलीचा विनयभंग, व्हिडिओ करुन ठेवला स्टेट्स - औरंगाबाद गुन्हे बातमी

सातारा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विशेष मुलांच्या शाळेत शिकत असलेली मुलगी शुक्रवारी संध्याकाळी शाळेच्या बसमधून घरी जात होती. त्यावेळी चालकाने त्याच्या दोन मित्रांना बसमध्ये बसवले. त्यानंतर चालकाच्या बाजूला बसलेल्या मुलीचा या तिघांनी विनयभंग केला.

Aurangabad
बसचालकाकडून मुलीचा विनयभंग

By

Published : Jan 18, 2020, 9:13 PM IST

औरंगाबाद- विशेष शाळेमध्ये शिकणाऱ्या 8 वर्षीय मतिमंद मुलीचा शाळेच्या बसमधून घरी सोडत असताना, बसचालक आणि त्याच्या दोन मित्रांनी विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. तसेच तीला जीवे मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे आरोपींनी या घटनेचे चित्रीकरण करत त्याचा व्हॉटस्अपवर स्टेट्स ठेवला. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी या प्रकरणी बसचालकाला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.

बसचालकाकडून मुलीचा विनयभंग

हेही वाचा - 'शेतकऱ्यांसाठी झटणारा मी एकटाच... आता नवीन पक्ष स्थापन करणार'

सातारा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या विशेष मुलांच्या शाळेत शिकत असलेली मुलगी शुक्रवारी संध्याकाळी शाळेच्या बसमधून घरी जात होती. त्यावेळी चालकाने त्याच्या दोन मित्रांना बसमध्ये बसवले. त्यानंतर चालकाच्या बाजूला बसलेल्या मुलीचा या तिघांनी विनयभंग केला. यातील एकाने या घटनेचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले आहे. हे विकृत एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तो व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेट्स ठेवला.

हेही वाचा -वाहकाने दारू पिऊन बसमध्ये घातला धिंगाणा; प्रवाशांची तारांबळ

आज (शनिवारी) सकाळी स्टेट्स एका नागरिकाने पहिला. त्याने याबाबत शाळा प्रशासनाला काळवल्यानंतर शाळा प्रशासनाने घटनेचे गांभीर्य पाहता त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शाळेच्या मुख्यधपिकेच्या तक्रारीवरून सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बस चालकास ताब्यात घेतले असून इतर दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details