औरंगाबाद (Aurangabad) पर्यटन नगरी असलेल्या जिल्ह्यात ऐतिहासिक वारसा मोठा आहे. वेरूळ अजिंठा सारख्या जागतीक दर्जाच्या पर्यटन (The world famous Ajanta Ellora Caves) स्थळांसोबत बिबिका मकबरा आणि देवगिरी किल्ला विशेष आकर्षण ठरते. दरवर्षी लाखो पर्यटक शहरात पर्यटनासाठी दाखल (special favorite of tourists) होतात. त्यावर कोट्यावधींची उलाढाल होत असते.
अजिंठा लेणी उतरते पसंतीसजगप्रसिद्ध अजिंठा लेणी वाकाटक, गुप्त आणि सातवाहन कालखंडातील आहे. इसवी सन दुसरे शतक ते सातवे शतक या काळात लेण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. परिसरात तीस लेणी असून पूर्ण लेण्या बुद्ध लेण्या आहेत. लेणी क्रमांक 1, 2, 16 आणि 17 मध्ये बुद्धाच्या जीवनातील जातक कथा चित्रित करण्यात आल्या आहेत. या लेण्यांचे वैशिष्ट्य जर पाहिले, तर बुद्धांच्या जन्माच्या आधीपासूनच्या कथा यात रेखाटण्यात आणि चित्रित करण्यात आल्या आहेत. बौद्ध धर्माच्या आधारावर या सर्व कलाकृती आहेत. बुद्धांच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाणा पर्यंतचा प्रवास या लेण्यांमध्ये अनुभवायला मिळतो. अतिशय कोरीव आणि रेखीव अशा कलाकृती या लेण्यांमध्ये साकारण्यात आल्या आहेत, अशी माहिती इतिहास तज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी दिली.
वेरूळ लेणीचे वैशिष्ट्य ठरते आकर्षकवेरूळ परिसरात एकूण 34 लेण्या आहेत. यामध्ये लेणी क्र. 1 ते 12 या बौद्ध संस्कृती, लेणी क्र. 12 ते 30 हिंदू संस्कृती लेणी, तर लेणी क्र. 31 ते 34 या जैन संस्कृतीचे दर्शन घडवतात. जगामध्ये या तीन्ही संस्कृतीचे एकत्र दर्शन घडवणारी वेरूळ लेणी ही एकमेव आहे. सह्याद्री पर्वत रांगांमध्ये डेसॉल्ट दगडात या सर्व कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. द्रविडीयन पद्धतीत साकारण्यात आलेल्या लेण्यांची निर्मिती इ.स 600 ते 1000 या काळात निर्माण झाल्याचे सांगितले जाते. व्यापारी मार्गावर असल्याने या लेण्या पहिल्यापासूनच प्रसिद्धी झोतात होत्या. धर्म वाढवण्यासाठी लेण्यांच्या माध्यमातून त्याकाळी प्रचार केला जात होता. त्यातूनच या लेण्यांची निर्मिती झाल्याचे इतिहासतज्ञ डॉ. संजय पाईकराव यांनी सांगितले.